नंदुरबार :१३/३/२३
शहादा तालुक्यातील मुबारकपुर येथील सरपंच व तरूण मंडळींनी पुढाकार घेत शनिवारी दारु विक्रीच्या विरोधात एकवटले. गाव शिवार परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी अवैध दारू विक्री वाढल्याने अनेक कुटुंबात वाद होत आहे.
दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडले असून अनेक लहान शाळकरी मुले दारूच्या व्यसनाधीन झाली आहे.
याबाबत गावातील सरपंच, सदस्यसह दारु विक्रीच्या विरोधात अचानक मोर्चा काढून प्रशासनचं लक्ष वेधून घेतलं.
तालुक्यात आठ दहा दिवसा अगोदरच बहिरपुर, बिलाडी परिसरातील गाव शिवारात, गावातील महिला बचतगटासह ग्रामस्थांनी दारू विक्रीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता.
हे लक्षात घेत मुबारकपुर गावाचे सरपंच, तरुण मंडळीच्या पुढाकाराने गाव शिवार परिसरातील गावठी अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर जाऊन स्वतः दारू व मुद्देमाल जप्त केला.
यावेळी सरपंच भारत अहेर, ग्रा.पं.सदस्य सागर अहेर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश अहेर, सामजिक कार्यकर्ता संदीप अहेर, सुकदेव अहेर, नटवर अहेर, सुदाम अहेर, विश्वनाथ अहेर, दिपक पवार, सावन अहेर, महेश अहेर, विठ्ठल अहेर यांच्यासह गावकरी तरुण व जेष्ठ मंडळी उपस्थित होते.
व विक्री करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.