कजगावमध्ये रेल्वे अपघातात अज्ञात तरुणाचा मृत्यू | youth died in a train accident in Kajgaon

0
249
youth died train accident Kajgaon

कजगाव: (Kajgaon) तालुक्यातील भोरटेक शिवारात रेल्वे अपघातात 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण सकाळी कामावर जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होता. त्याचवेळी रेल्वेची चक्कर येऊन तो खाली पडला. त्याला डोक्याला आणि हाता-पायांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

download

मृत तरुणाची उंची साडे पाच फूट असून त्याच्या दोन्ही हाताच्या आंगठयाला इंग्रजी मध्ये “जी. एस.” असे गोंधले आहे. तरुणाचे नाव आणि पत्ता अद्याप समजू शकलेला नाही.

रेल्वे कर्मचारी हिलाल गौतम बागुल यांच्या माहितीवरून भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगावचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र विसपुते पुढील तपास करत आहेत.

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here