नंदुरबार :- प्रकाशा येथील गोमाई नदीच्या पात्रात एका युवकाचा मृतदेह मिळून आला. मयत युवक हा म्हसावद येथील असल्याचे समोर आले आहे.
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील गौतमेश्वर महादेव मंदीराजवळील गोमाई नदी पात्रात एका युवकाचा मृतदेह तरंगतांना मिळून आला. सदर युवकाचा मृतदेह हा गोमाई नदीत तरंगताना मच्छीमार करणारे व सिताराम भगत यांना दिसून आला. यावेळी झिंगाभोई व नागरीकांनी स्थानिक पोलिसांना युवकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
प्रकाशा दूरशेत्राचे जमादार महेरसिंग वळवी यांनी घटनास्थळी भेट दिली. मयत युवकाची ओळख पटविली असता म्हसावद रेथील सत्तार सल्लाउद्दीन पिंजारी (मन्रार,वय २५) असे असल्याची ओळख रऊफ इब्राहिम पिंजारी यांनी पटवून दिली. याबाबत रऊफ पिंजारी यांनी दिलेल्या खबरीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह पट्टीचे पोहणारे सिताराम भगत, प्रभू परदेशी, भोई, गणपत भिल यांनी काठावरआणण्यासाठी सहकार्य केले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

