नंदुरबार : २३/३/२३
धडगांव पंचायत समितीच्या कर्मचार्यांच्या निवासस्थानी नागरीकांनी अतिक्रमण केले असून याबाबत काही कारवाई होत नसल्याने जि.प.च्या स्थायी सभेत जि.प.सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
नंदुरबार येथील याहामोगी सभागृहात जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी महिला बालकल्याण सभापती संगिता गावीत, हेमलता शितोळे, गणेश पराडके अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जि.प.सदस्य विजयसिंग पराडके यांनी धडगांव येथील पंचायत समितीच्या कर्मचार्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवास्थान परिसरात काही नागरीकांनी अतिक्रमण केल्याचे सांगत गेल्या दोन वर्षापासून हा विषय लावून धरला असला तरी यावर कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
त्या नागरीकांनी कब्जा केला आहे तर त्यांना नोटीस का देत नाही असा सवाल उपस्थित केला.
यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी यावेळी सांगितले की, आमच्या काळाततरी अधिकारी तीथपर्यंत पोहोचले. याबाबत संबंधित विभागाने त्याठिकाणी जावून योग्य कारवाई करण्याचा सूचना त्यांनी दिल्या.
जि.प.सदस्य भरत गावीत यांनी शहादा प्रकल्पात १०६ व रनाळा प्रकल्पात ९० अंगणवाडया या नॉनटिएसपीमध्ये येतात. याठिकाणी बालकांना अन्न शिजवण्यासाठी चुलीचा आसरा घ्यावा लागतो.
ग्रामपंचायतीला मिळणार्या १० टक्यातील निधीतून या १९६ अंगणवाडयांना गॅस सिलेंडर देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. विविध विषय समित्यांचा आढावा घेत जि.प.सदस्य विजयसिंग पराडके यांनी वर्गखोल्यांबाबत माहिती मागितली असता २८ मधून २५ वर्ग खोल्यांचे काम होणार असल्याचे सांगत ई टेंडर झाले आहे. असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
तसेच जि.प.सदस्य विजयसिंग पराडके यांनी जुने धडगांव येथील जि.प.च्या शाळेत २० वर्ग खोल्या आवश्यक आहेत. त्यांना कधी मंजूरी मिळेल. असा सवाल केला.
त्यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी या वर्ग खोल्यांना निधी जास्त असल्याने मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमातून निधी आयोगाकडील मंजूर निधीतून नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी व अक्कलकुवा या तालुक्यातील ७० अंगणवाडी केंद्राना सोलर पॉवर पॅकसह दोन फॅन, तीन टयुब लाईल व टिव्ही संच बसविणे या योजनेचा ई निविदा स्विकृतीस मंजूरी देण्यात आली.
तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार