अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी केला जीवघेणा हल्ला..

पालघर :२४/३/२३

पालघर शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या स्वरूपात वाढलेत..

ती बांधकामे तोडण्याची मोहीम पालघर नगरपालिकेने हाती घेतली..

मात्र जेसीबी चालकावरच एका अज्ञात तरुणाने रागाच्या भरात जीवघेणा हल्ला केला
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर शहरातील बोईसर रोड जीवन विकास शाळा या समोरील भाग तसंच माहीम रोडवरील 70 गाळा परिसरातील रोड या ठिकाणी असलेल्या बांधकामावर जेसीबीने हातोडा चालवला..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

काही प्रतिष्ठित बंगल्यांचे कुंपण रस्त्यावर असल्याने जेसीबीच्या साह्यानं तोडण्यात आलं…

जेसीबी वर चढून एका अज्ञात तरुणांना पथकातील जेसीबी चालकावर कोयतांना हल्ला केला…

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तात्काळत्या तरुणास पाठीमागून पकडून जीवघेणा हल्ला होण्यापासून अडवण्यात आलं मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही हे तेवढेच बरं… यावेळी पथकात असणाऱ्या अभियंतांना शिवीगाळ करण्यात आला…

पालघर नगरपालिका पथकाने अशा परिस्थितीत बांधकाम पाडून मोकळ केलं…

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/36S6BFu

तात्काळ पोलिसांनी हल्लेखोराला जेरबंद केलं आणि ताब्यात घेतलं…

या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांना पोलिसांनी दिलं…
अशा स्वरूपाचे हल्ले जर पथकातील आणि पालिकेतील अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर होत असतील तर ही बाब अतिशय गंभीर मानली जाते..

त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलावा हीच अपेक्षा…
ऋषिकेश जाधव ,पालघर प्रतिनिधी ,एम.डी. टी.व्ही. न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here