नंदुरबार:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्हात पुढील दोन दिवस हवामान अंशत: ढगाळ राहील. मात्र तापमानात वाढ होत असून कमाल तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऊन व उकाड्याने नागरिक हैराण झालेले दिसून येत आहेत. दुपारी रस्ते निर्मनुष्य दसु लागले आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार तालुक्यात १८ ते २० एप्रिल दरम्यान हवामान अंशत: ढगाळ राहील. किमान तापमान २१ ते २२ व कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार कालपासून जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाचा चटका बसू लागल्याने नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत घरात थांबणे पसंत केलेले दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक तापमान शहादा तालुक्यात आहे. हवामान अंदाजानुसार शहादा तालुक्यात हवामान अंशत: ढगाळ राहील. किमान तापमान २१ ते २३ व कमाल तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअस राहील. नवापुर तालुक्यात हवामान अंशत: ढगाळ राहील. किमान तापमान २० ते २२ व कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तळोदा तालुक्यात हवामान अंशत: ढगाळ राहील. किमान तापमान १९ ते २२ व कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअस राहील. अक्कलकुवा तालुक्यात हवामान अंशत: ढगाळ राहील. किमान तापमान १८ ते २१ व कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील.
अक्राणी तालुक्यात हवामान अंशत: ढगाळ राहील. किमान तापमान २० ते २३ व कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.