नंदुरबार :१६/३/२३
नंदुरबार कडे परतत होते गस्तीवर असणारे पोलीस वाहन…
एका भरधाव वर्गातील ट्रकने समोरून धडक दिली या अपघातात एक पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले..
नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात पोलिस निरीक्षक आणि एका कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत तर एका कर्मचाऱ्यास पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आलं…
पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सावळे वाहन चालक प्रकाश कोकणी हे काल रात्री तळोदा परिसरात गस्तीवर होते…
गस्त आटपून पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास तिघे पोलीस वाहन क्रमांक एम एच बारा एस क्यू एक शून्य 48 ने नंदुरबार कडे परतत होते..
एम एच 14 एफ टी 51 67 या भरदार ट्रकने वाहनाला समोरून धडक दिली.. दोघांना नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं..
तर प्रकाश कोकणी यांच्या कमरेला जास्त मार बसला असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मुंबई येथे पाठवण्यात आलं… दोघांची प्रकृती स्थिर आहे तर पोलीस वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..
ट्रकचालक सचिन शिरसाठ राहणार दवेपुर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे… जिल्हा पोलीस प्रमुख पी आर पाटील यांनी पार्टी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केलं…
दुपारी पुन्हा रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची पोलीस प्रमुखांनी विचारपूस केली…
पोलिसी वेशातील माणुसकीचा झरा काय असतो याच दर्शन घडवलं जिल्हा पोलीस प्रमुख पी आर पाटील साहेबांनी… यावेळी जखमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांच्या कडून माहिती घेतली तर कुटुंबीयांना धीर दिला..
घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगत त्यांना धीर दिला..
यावेळी शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने आदी रुग्णालयात उपस्थित होते..
जीवन पाटील कार्यकारी संपादक एम.डी. टी.व्ही न्यूज नंदुरबार