अपघात : अक्कलकुव्यातील दोन तरुणांनी गमावला जीव

0
351
R 3

नंदुरबार: – अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर अज्ञात ट्रकने धडक दुचाकीला दिल्याने १५ वर्षीय युवक ठार झाला आहे तर मोलगी -अक्कलकुवा रस्त्यावर आमलाबारी गावाच्या पुढे वळणावर आयशरने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात २५ वर्षीय तरुण ठार झाला आहे. या दोन्ही अपघातात चार जण जखमी झाले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन समोर चालत असलेली दुचाकी (क्र.जीजे.२२ क्यू ११४३) हिस मागून धडक दिली. या अपघातात संदीप कुशन तडवी (वय १५,रा.कोराई,ता.अक्कलकुवा) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातात धिरज कनखाडी (ता.सागबारा,जि.नर्मदा) व राजेश विजय तडी (रा.पानखला,ता.सागबारा) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

ट्रकचालक अपघात घडल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत कुशन गुलाब तडवी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रक चालकाविरोधात भांदवि कलम ३०४ (अ),२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ. उल्हास ठिंगळे करत आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दुसऱ्या एका घटनेत आयशरने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात आयशर चालकाने मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावर आमलाबारी गावापुढे भरधाव वेगाने वाहन चालविल्याने रस्त्यावर पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात जितेंद्र खेत्या वळवी (वय २५,रा.जांगठी,ता.अक्कलकुवा) हा तरुण ठार झाला. तर शिलाबाई मंगेश वसावे व नरेंद्र जयसिंग वळवी (रा.जांगठी,ता.अक्कलकुवा) हे दोघे जखमी झाले आहेत.

आयशरचालक मात्र अपघात घडल्यानंतर घटना स्थळावरुन पसार झाला.याबाबत खेत्या खुमा वळवी यांच्या फिर्यादीवरुन आयशर चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ),२७९,३३७,३३८,४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय ठाकुर करत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here