जळगांव :२४/३/२३
भडगाव तालुक्यात मोठ्या स्वरूपात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं उभ पीक आडवं झालं..
त्याचा पंचनामा करण्यासाठी थेट रात्री कृषी सहाय्यक यांनी शेताचा बांधा गाठला
भडगाव तालुक्यातील पथराड येथे कृषी सहाय्यक संदीप पाटील यांनी भगवान माळी अरुण माळी सोपान पाटील या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रात्री पंचनामे केले..
अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं पिकाचं मोठं नुकसान झालं…
शासकीय कर्मचाऱ्यांचा संप असल्या कारणाने वेळेत पंचनामे होऊ शकले नाहीत…
ती वेळ भरून काढण्यासाठी कृषी सहाय्यक संदीप पाटील यांनी रात्री सुद्धा पंचनामे करण्याचा निर्णय घेऊन शेती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे युद्ध पातळीवर करण्याचा निर्णय घेतला…
संदीप पाटील यांच्याकडे कामाचा अतिरिक्त भार असल्याने पंचनामे रखडण्याची शक्यता वाटत होती
मात्र त्यांनी वेळेत रात्री येऊन पंचनामे केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आलं…
तर कृषिमंत्र्यांनी थेट त्यांच्या व्हाट्सअप वरती पिकांच्या नुकसानीचे फोटो पाठवण्याचा सांगितलं होतं
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/36S6BFu
मात्र त्यांचा मोबाईलच स्विच ऑफ येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात..
कर्तबगारीच या अधिकाऱ्याच्या शेतकरी वर्गातून सर्वत्र कौतुक होतंय…
सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी ,एम.डी. टी.व्ही. न्यूज