अजबच : भाडेकरुच निघाला चोर!

0
255

पटेलवाडीतील चोरीचा एलसीबीने ८ तासातच लावला छडा !

नंदुरबार :- शहरातील पटेलवाडी परिसरात राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील कपाटामधून सुमारे ९ लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार गुन्हा अन्वेषण शाखेने दोनच दिवसात गुन्हा उघडकीस आणला असून या घटनेत भाडेकरू म्हणून राहत असलेलाच चोरटा निघाल्याने सर्वानाच आश्यर्याचा धक्का बसला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दि.२ ते ४ मे दरम्यान पटेलवाडीतील प्लॉट नंबर ११५ मधील रहिवासी शेख युसुफ शेख चांद यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील कपाटामधून ८ लाख ९७ हजार २५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले होते. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्याचवेळी शेख युसुफ शेख चांद यांच्या घरात भाडेकरु म्हणून ३ वर्षापासून राहत असलेले जुबेर इब्राहिम शहा याने देखील त्यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याबाबत सांगितल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

जुबेर शहा यांच्या घरात झालेल्या घरफोडीच्या घटनास्थळाची श्री.पाटील पाहणी करीत असतांना जुबेर शहा यांना काही प्रश्न विचारण्यात आले मात्र, ते घरात चोरी झाल्याचा बनाव करीत असल्याचा संशय आला. म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन जुबेर शहा यास सखोल विचारपूस करण्याचे आदेश दिले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पथकांनी जुबेर इब्राहीम शहा विचारपुस केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर मात्र त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेला ८ लाख ९७ हजार २५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम मुद्देमाल देखील त्याच्याच घरातून काढुन दिला. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गंभीर गुन्हा अवघ्या काही तासात उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकास पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले. सदर कामगिरी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक सागर आहेर, पोलीस नाईक राकेश मोरे, भटु धनगर, पोलीस अंमलदार अभय राजपुत, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here