अजबच … नंदुरबारातून पाण्याच्या टॅँकर चोरीला

0
293

नंदुरबार : चोरटे काय चोरून नेतील याचा काही नेम नाही. दुचाकीसह ट्राला चोरीला गेल्याच्या बातम्या आपण ऐकल्याचं असतील. पण नंदुरबार रुग्णलयाजवळून चोरट्याने चक्क पाण्याचा टॅँकर चोरुन नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
R

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार येथील शैलेशकुमार गाडीलोहार यांच्या मालकीचा पाण्याचा टॅँकर जिल्हा रुग्णालयाजवळ असतांना सदर ५० हजार रुपये किंमतीचा ५ हजार लिटर पाण्याचा टॅँकर चोरट्याने चोरुन नेला.

SPONSORED CONTENT

याबाबत शैलेशकुमार गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रायसिंग वळवी करीत आहेत.

एमडीटीव्ही न्युज नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here