साक्री :२०/२ /२३
- शॉर्ट
- १. शाळेचा परिसर झाला होता भगवेमय …
- २. विद्यार्थी श्रीवर्धन पवार बनला बालशिवाजी तर शिक्षिका कोमल पवार बनल्या माँ जिजाऊ …
साक्री आणि पेरेजपूर येथील ऑर्किड शाळेच्या शैक्षणिक संकुलात छत्रपती शिवाजी महाराज जयंती अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली .
शिवजयंतीच्या निमित्तानं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रॅली ,अभिवादन कार्यक्रम ,सांस्कृतिक सोहळा याच आयोजन केलं जात.
विद्यार्थ्यांमध्ये असलेला उत्साह ओसंडून वाहतांना अनुभवास येतो ..
तसाच काही अनुभव या शाळेत काढलेल्या मिरवणुकीतून आला .शिवाजी महाराज आणि त्यांचे पैलू आजच्या शालेय विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष अनुभूतीतून साकारता यावेत या हेतून प्राचार्या योजना देसले यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली .
आणि चक्क बाल शिवाजीच्या भूमिकेत विद्यार्थी शाळेत अवतरले …ते सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले .
पाहू या अनोखा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण …
शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशांचा गजर करीत शालेय परिसर दणाणून सोडला होता .
विद्यार्थ्यांसह शिक्षक -शिक्षिका या मिरवणुकीत तल्लीन होऊन सहभागी झाल्याचं पाहावयास मिळालं .
यावेळी उपस्थीत संस्थेचे चेअरमन इंजी. मनोजकुमार भास्करराव देसले व संस्थेच्या सेक्रेटरी श्वेता मनोजकुमार देसले यांनी आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.
जितेंद्र जगदाळे,साक्री तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज