बामसेफतर्फे विविध कार्यक्रमांनी महापुरुषांना मानवंदना..

0
321

नंदुरबार :१८/४/२३

बीएस-४ अर्थात भारतीय संविधान सम्मान सुरक्षा संवर्धन राष्ट्रव्यापी महाजनजागरण अभियान अंतर्गत राष्ट्रपिता जोतीराव फुले व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गुरुवार १३ एप्रिल २०२३ रोजी बामसेफ व सहयोगी संघटना यांच्यामार्फत मूलनिवासी मेळावा घेण्यात आला.

1 4
1
3 4
2
4 5
3
5 4
4

मेळाव्याचे उद्घाटन बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते यांनी केले.

तसेच दि.१४ एप्रिल रोजी संविधान कार्यान्वयन चेतना रॅली काढण्यात आली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मूलनिवासी मेळाव्यात सभ्यता व कलाचार कार्यक्रमात फुले-आंबेडकरी आंदोलनाची गीते व नाटीका सादर करण्यात आली.

कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनीच सहभाग घेतला होता.

त्यात सिध्दांत सामुद्रे, जयअंश म्हसदे, दिशा पानपाटील, मंयुरी पवार, काव्यांजली पवार, खुशबू वाघ, मालती मोरे, रेखा तायडे, उषा जाधव, विद्या पानपाटील, मेघा जाधव, सुनिता पवार, अशूल, अनुष्का बागले, अस्मिता मोहिते, आराध्या जाधव, रौनक हिरकणे, मालती मोहिते, संगिता पवार, दिशा सैंदाणे, जयश्री पानपाटील, प्रिती बेडसे, शुभांगी बागले, रंजिता हिरकणे, रुपाली पिंपळे, गार्गी पिंपळे, संगिता म्हसदे, मेघा पवार, शोभा ढोढरे, मनिषा ठाकरे, अश्विनी पवार, निधी तायडे, खुशी थोरात, खुशी पानपाटील, मेघा जाधव, हर्षदा मोरे, प्रियंका ठाकरे, हितांक्षी सोनवणे, चेतन अहिरे आदी महिला व बाल कलाकारांनी सहभाग घेतला.

सुत्रसंचलन संगिता वाघ यांनी तर आभार प्रविण खरे यांनी मानले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन व संविधान गौरव गीत गायन करून रॅलीस सुरुवात झाली.

डॉ भिमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व संविधान गौरव गीत गायन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत शेकडोंनी जनसमुदाय सहभागी झाला.

नारायण ढोडरे,प्रतिनिधी:-ग्रामीण नंदुरबार,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here