नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील डिगीआंबा येथे एकास शेतीच्या वादातून संगनमत करुन लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील डिगीआंबा येथील गुमानसिंग सरवरसिंग पाडवी हे आंबाबारी शिवारातील शेतात दादर पिकाची काढणी करत असतांन शेतीच्या वादातून मंगलसिंग रतनसिंग पाडवी, रमजानसिंग रतनसिंग पाडवी, दिलवरसिंग रमजानसिंग पाडवी, लालसिंग मंगलसिंग पाडवी, विमलाबाई मंगलसिंग पाडवी, मुकूंदा मंगलसिंग पाडवी यांनी लाठ्या-काठ्यांनी डोक्यावर, तोंडावर, छातीवर, पाठीवर तसेच दोन्ही पायावर मारुन दुखापत केली.
तसेच शिवीगाळ करीत दमदाटी केली. याबाबत गुमानसिंग सरवरसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. भोये करीत आहेत.