आदिवासी विकास मंत्री ना. डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार इमारतीचे भूमिपुजन
धुळे : आदिवासी विकास विभागातंर्गत महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी, नाशिक संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कुल, लौकी, ता. शिरपूर, जि. धुळे या शाळेच्या इमारतीचा भूमिपुजन समारंभ शुक्रवार, 7 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती आश्विनी पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ हिना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, डॉ सत्यजित तांबे, जयकुमार रावल, काशिराम पावरा, कुणाल पाटील, श्रीमती मंजुळाताई गावित, फारुक शाह, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत आदि उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन तृप्ती धोडमिसे, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांनी केले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो,नंदुरबार.. शिरपूर