Big Breaking… सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक पुन्हा एकत्र ; उद्या बंगळुर येथे बैठक .. ठरणार आगामी रणनीती

0
201

बंगळूर : सत्ताधारी भाजपाच्या विरोधात पुन्हा एकदा विरोधक एकत्र येत असून आगामी राजकारणाची तसेच निवडणुकांची रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. भाजपाला सत्तेतून दूर करण्यासाठी आणि २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर मंथन होणार असून निवडणूक लढण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यासाठी उद्या १७ जुलै रोजी कर्नाटकातील बंगळुर येथे ही महाबैठक होणार आहे. या बैठकीला सुमारे २४ विरोधी पक्ष उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमुख पक्षांचे नेते भेटणार आहेत आणि आगामी निवडणुकांसाठी त्यांच्या रणनीतीवर चर्चा करणार आहेत. दरम्यान, आज आज संध्याकाळी बंगळूर येथे डिनरला काही नेते उपस्थित राहतील तर काही नेते थेट बैठकीला येणार असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

संसदेचे पावसाळी अधिवेशन होत असताना ही बैठक होत आहे. १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बैठक सुरु होईल आणि दुपारी ४ वाजेपर्यंत चालेल. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व बडे नेते बंगळुरुमधील विरोधी पक्षांच्या महत्तवपूर्ण बैठकीत उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

या महाबैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट, नॅशनल कॉन्फरस आदी २४ विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीची सर्व जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर सोपविण्यात आली असून त्यांची प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आज संध्याकाळी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी रात्री स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहभोजनाला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार नाहीत. ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. शरद पवार हे उद्या होणाऱ्या बैठकीस सहभागी होणार आहेत.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, बंगळूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here