तळोदा /नंदुरबार -४/६/२३
कर्ज प्रकरण करतांना एजन्ट पद्धत बंद करावी यासाठी बिरसा फायटर्सने तहसीलदार तळोदा मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की,विविध कामासाठी बँकाकडून कर्ज प्रकरण केले जाते.
परंतु,काही बँक मधील एजंट कर्ज काढतांना काढलेल्या रक्कमेतुन एजेंट २० ते ३० टक्के रक्कम वजा करून कर्जदाराला बँकाकडूनच उरलेली रक्कम दिली जाते.
पूर्ण बोजा मात्र कर्जदार शेतकऱ्यांवर चढवला जातो.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अनेक शेतकरी अज्ञानी असल्याने कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या,अंगठा करून घेतात.
शेतकऱ्यांची फसवणूक होतांना निदर्शनास येत आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एजेंट दलालावर आळा बसावा यासाठी बँकामधील एजेंट पद्धत बंद करण्याची मागणी केली आहे.
निवेदनावर बिरसा फायटर्स राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,जिल्हा सल्लागार ऍड.गणपत ठाकरे,जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,तालुका कार्याध्यक्ष किरण पाडवी,सचिव सुरेश मोरे,रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा, धजापाणी शाखाध्यक्ष डोंगरसिंग पावरा,खर्डीचे उपाध्यक्ष गुलाबसिंग पाडवी,हेमंत ठाकरे,दिवाण वळवी,प्रवीण पाडवी,दादी पाडवी, अरुण पाडवी यांच्या सह्या आहेत.
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज