नंदुरबार : २५/३/२०२३
चांदसैली घाटातून जात असताना पिकअपचा ब्रेक फेल झाल्याने घडलेल्या अपघातात तीन जण गंभीर झाले.
घाटात जीप उलटल्याने इतर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात मंगळवारी झाला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात राज्यात मजुरीसाठी गेलेले मजूर पिकअप वाहनाने (क्र.एमएच ०२ वायए ७२७६)घरी परतत होते.
साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास चांदसैली घाटात अचनाक समोरुन वाहन येत असल्याने ब्रेक फेल झाले.
त्यामुळे गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
अपघातात वतनसिंग विक्रमसिंग पाडवी (वय ३२), सोनी धीरसिंग पराडके(वय ६), मनीषा धीरसिंग पराडके(वय ४), विश्रांती धीरसिंग पराडके (वय ३), पूजा प्रकाश वळवी (वय १९), शितल दिज्या पाडवी (वय १५), यमुना वतन पाडवी (वय २९) व फुलसिंग बारा पाडवी (वय ६५) हे आठ जण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी फेंदा बाबा वळवी यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाहन चालक दिपप्रकाश दिपक वळवी याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन पाटील ,कार्यकारी संपादक ,एम. डी. टी. व्ही. न्यूज,नंदुरबार