नंदुरबारात घरफोडी ; दागिन्यांसह रोकड लंपास

0
266
55df70c0cd7b9895d1a4b4c84837bea86ed46093

नंदुरबार : शहरातील पटेलवाडी येथे चोरट्याने घरफोडी करीत दागिन्यांसह रोकड असा सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.

नंदुरबार शहरातील पटेलवाडी येथील साजिदअली युनूसअली सैय्यद हे शहादा येथे गेले होते. यावेळी पटेलवाडी येथील त्यांच्या घरी भाचा उवेश जेवणासाठी घराशेजारी जातांना घराच्या दरवाजाला कडी लावून गेला.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी अज्ञाताने घराच्या दरवाजाची कडी उघडून आता प्रवेश केला. घरात असलेले २ हजार रुपये किंमतीची रोकड, ३०० रुपये किंमतीच्या सौदी अरेबियन नोटा व १ लाक ५४ हजार ५०० रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने असा ऐवज चोरुन नेला.

SPONSORED CONTENT

याबाबत साजिदअली युनूसअली सैय्यद यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. ब्युरो नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here