
नंदुरबार : अक्कलकुवा गावाच्या पुढील राजमोही फाट्याजवळ एस.टी.बसने कारला धडक दिल्याने तिघांना दुखापत झाली असून बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील पेन येथील कपिल विजय जैन हे त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनाने (क्र.एम.एच.०६ सीडी १७३२) भरूच येथून बळसाणे येथे जात होते. यावेळी धुळे एस.टी. बस आगारातील चालक शशिकांत रोहिदास पाटील याने त्याच्या ताब्यातील एस.टी.बस (क्र.एम.एच.२० बीएल ४०४५) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात बस चालवून राजमोही फाट्याजवळ मागून चारचाकी वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
घडलेल्या अपघातात कपिल विजय जैन, नेहा कपिल जैन व भुराबाई अहिरे यांना दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. यााबत कपिल जैन यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात बस चालक शशिकांत पाटील याच्याविरोधात २७९, ३३७, ४२७ सह मोटार वाहन कायदा कमल १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर कोळी करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. ब्युरो नंदुरबार

