“बटरफ्लाय’चा जगात डंका : नंदुरबारची शॉर्टफिल्म ठरली सर्वाेत्तम!

0
213

नंदुरबारमधून निर्मिती आणि दिग्दर्शन हि नंदुरबार मधले… कलाकारही नंदुरबारचेच … डॉक्टरांच्या जीवनावर आधारित “बटरफ्लाय’ या शॉर्टफिल्मने आपला जगात डंका निर्माण केला आहे. तब्बल १२० देशांच्या १३ हजार ८६८ लघुचित्रपटानी या अमेरिकेतील न्यू.जर्सी फेस्टीवलमध्ये “बटरफ्लाय’ शॉर्टफिल्म सर्वोत्कृष्ठ ठरली आहे. “बटरफ्लाय’ही शॉर्टफिल्म बेस्ट लघूचित्रपट म्हणून निवड झाली असून २५ जून रोजी एका भव्य सोहळयात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यामुळे नंदुरबारच्या गौरवात भर पडली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार येथील डॉ.राजकुमार निर्मित व डॉ.सुजित पाटील दिग्दर्शित “बटरफ्लाय’ या हिंदी लघूचित्रपटाला अमेरिकेतील न्यू.जर्सी येथे पार पडलेल्या “स्टूडंट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टीवल’ मध्ये बेस्ट फिल्मचा ॲवार्ड घोषीत झाला. १२० देशांच्या १३ हजार ८६८ चित्रपटानी या फेस्टीवलमध्ये सहभाग नोंदवला असून त्यात बटरफ्लायची बेस्ट लघूचित्रपट म्हणून निवड झाली आहे.

हे सुध्दा वाचा:

बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS

महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS

जळगावातील खेळाडूंसाठी क्रीडा मंत्र्यांकडून मोठे गिफ्ट … ३६ एकर जागा केली मंजूर ! – MDTV NEWS

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

नंदुरबारच्या कलावंतांनी बनवलेल्या या हिंदी लघूचित्रपटाने दक्षिण कोरीयासह भारतात ५७ ॲवार्ड मिळवले आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांसह आता परिक्षकांच्या नजरेतही पसंतीस उतरला असून अमेरिकेत पुरस्कार मिळवणारा हा खानदेशातील पहिलाच लघुचित्रपट ठरला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा:

बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS

महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS

जळगावातील खेळाडूंसाठी क्रीडा मंत्र्यांकडून मोठे गिफ्ट … ३६ एकर जागा केली मंजूर ! – MDTV NEWS

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

“बटरफ्लाय’ लघुचित्रपटाने आता पर्यंत देशभरात ५७ अवार्ड मिळविले आहेत. या लघु चित्रपटाने १३ हजार ८६७ चित्रपटांमध्ये आधी नामांकन तसेच त्यानंतर बेस्ट लघू चित्रपटाचा अवार्ड घोषित झाल्याने नंदुरबारसह खानदेशासह महाराष्ट्राचा सन्मान झाला आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here