शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत संभाव्य यादी देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेना आणि भाजपाच्या कोट्यातून कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याबाबत तर्क वितर्कांना ऊत आला आहे. मात्र संभाव्य यादी वगळता यावेळी मिनी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं समोर येत आहे. भाजप-शिवसेनेचे मिळून अवघ्या १० जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे, त्यामुळे इच्छुकांपैकी अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
भाजप आणि शिवसेनेतील केवळ १० आमदारांना मंत्रिपदीची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या वाट्याला ४ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रीपद तर शिवसेनेला २ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचा लवकरचं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
सध्या शिंदे सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी ९ कॅबिनेटमंत्री आहेत. त्यामुळे आणखी २३ जणांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. मात्र यावेळी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ १० जणांचाच समावेश केला जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला समतोल राखता आला नसल्याची देखील चारचा होत आहे. सध्या शिवसेनेचा मुंबई आणि विदर्भातील एकही मंत्री नाही. तर इकडे मराठवाड्यात शिवसेनेचे संदिपान भूमरे आणि अब्दुल सत्तार हे दोन कॅबिनेट मंत्री आहेत. तर संजय शिरसाटही मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई आणि विदर्भाला संधी मिळणार का ? याकडे शिवसेनेतील इच्छुकांचं लक्ष लागून राहिलं आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ १० जणांनाच संधी मिळणार असल्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांपैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, मुंबई.