नंदुरबार -२/४/२०२३
केंद्रशासित भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं विविध आश्वासनाच्या घोषणा दिल्या..
पण त्या पोकळ ठरल्या..
एक एप्रिल म्हणजे एप्रिल फुल दिवस..
त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले
सद्यस्थितीत देशात वाढती बेरोजगारी वाढती महागाई यासारख्या अनेक समस्या आवासून उभे आहेत..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
जनता त्यामुळे त्रस्त झाली आहे मात्र भारतीय जनता पक्षांना सत्तेत बसण्यासाठी जनतेला आश्वासनांचा लॉलीपॉप दिलं आणि जनतेला एप्रिल फुल बनवलं..
म्हणून नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केक कापून मोदी च्या विरोधात ,केंद्र सरकारच्या विविध योजना संदर्भात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली..
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीविहार गेट परिसरात केक कापून मोदी विकास म्हणजे फसवा विकास याला विरोध दर्शवण्यासाठी प्रतीकात्मक आंदोलन यावेळी करण्यात आलं..
नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांनी नेमकं काय म्हटले ते ऐकूया…
यावेळी जिल्हा सदस्य माधव चौधरी ,कार्याध्यक्ष कमलेश चौधरी ,लक्ष्मण मोरे, महेंद्र चौधरी ,बबलू कदम बांडे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लल्ला मराठे, दिनेश माळी ,कालू पहिलवान जितेंद्र ठाकरे, जयंत मोरे ,धनराज बच्छाव, राजा ठाकरे ,निलेश चौधरी ,राजू शिंदे ,गणेश बागले ,मुकेश ठाकरे आदी उपस्थित होते…
नारायण ढोडरे, नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही. न्यूज नंदुरबार