नंदुरबार -२९/४/२०२३
कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा आत्मविश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केलेला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी काल शुक्रवारी मतदान घेण्यात आले.
मतदानानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रतिक्रिया दिली.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ते म्हणाले,गत पंचवार्षिकप्रमाणे यंदा देखील कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमच्याच गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकेल यात तीळमात्र शंका नाही.
आष्टे केंद्रावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला ..
प्रचाराच्या दरम्यान आमच्यावर विरोधकांकडून टीका टिपण्णी झाली.
मतदारांना खोटी आश्वासने देण्यात आली.
परंतु,मतदार राजा हा सुज्ञ असून बाजार समितीवर शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास सेना नेते चंद्रकांत रघुवंशींनी व्यक्त केलाय ..
प्रविण चव्हाण एम डी टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

