साळवे ग्रामपंचायतमध्ये वार्ड रचनेत फेरबदल- सदस्य पाटील यांची हरकत ..

0
177

शिंदखेडा -मार्च २५,२०२३

तालुक्यातील साळवे ग्रामपंचायत मधील वार्ड क्रं -1 मधील नावे वार्ड क्रं 2- 3 मध्ये परस्पर तलाठी व ग्रामसेवक यांनी टाकुन दिली आहे.

सदरील यादीतील नावाबाबत ग्रामपंचायत सदस्य संतोष भगवान पाटील यांनी हरकत घेतली असून तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व गटविकास अधिकारी देविदास देवरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनाद्वारे म्हटले आहे की, साळवे ग्रामपंचायत ची मुदत २५ जुलै -२३ ला संपत असल्याने राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी आदेशानुसार गावातील सर्व नागरिकांच्या प्रारुप रचनेची नोटीस व माहितीचा तक्ता तलाठी यांनी परस्पर तयार केलेला असुन आमच्या फक्त सह्या घेतल्या आहेत. त्यानंतर नियम (५) २ प्रमाणे वार्ड रचनेची यादी नोटीस बोर्डावर लावण्यात आली.

सदरची यादी पहाता तलाठी व ग्रामसेवक यांनी वार्ड क्रं १ मधील सुमारे ३५ लोकांची नावे वार्ड क्रं 2 व वार्ड क्रं 3 मध्ये टाकुन दिली आहे

प्रत्यक्षात ती लोक वार्ड क्रं १ मध्येच राहतात.

तलाठी व ग्रामसेवक यांनी वार्ड नुसार वार्ड मध्ये राहणाऱ्या लोकांची यादी न पाहता व प्रत्यक्ष घरांची चौकशी न करता बरेचशा ठेलारी लोकांची नावे दुसऱ्या वार्डात टाकली आहेत.

म्हणुन वार्डरचनेत तफावत निर्माण झाली असून त्यात हरकतदार ग्रामपंचायत सदस्य संतोष भगवान पाटील व इतर सदस्यांची देखील हरकत आहे.

तरी सदरची हरकतीची दखल घेऊन नवीन वार्ड रचना करण्यात यावीअशी मागणी चे निवेदन दिले आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

यावेळी पंचायत समिती सदस्य प्रकाश पंडित बोरसे, सदस्य संतोष भगवान पाटील, भगवान सत्तरसिंग गिरासे, हिरामण लहु अहिरे, हिरालाल लोटन पाटील, दिलीप संतोष भारती, हिरालाल जयराम भारती आदी उपस्थित होते.

यादवराव सावंत,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम.डी. टी. व्ही. न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here