दोंडाईचात धाडसी घरफोडी, 4 लाख 22 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला | Daring house burglary in Dondaicha

0
1553
house burglary Dondaicha

दोंडाईचा (Dondaicha): शहरातील स्टेशन भागातील बंद झालेली जुनी अंजुम टाकी जवळील भर रस्त्यावरील बंद घराची कडी तोडून घरातील सोने चांदीचे दागिन्यांसह तीन हजाराची रोकड असा एकूण चार लाख बावीस हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी दि. ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोंडाईचात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात सुभाष रामचंद्र गारुंगे (वय 66 वर्ष) रा. (जुनी अंजुम टाकी समोर चित्ते साहेबांच्या वखारी जवळ प्लॉट नंबर 109 दोंडाईचा ता‌. शिंदखेडा) येथे राहणारे भाऊ किशोर रामचंद्र गारूंगे त्यांच्या मालकीचे घर असून ते त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून परिवारासह गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे ते वैद्यकीय उपचारासाठी गेले होते. याच संधीचे सोने करत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून रात्रीच्या सुमारास भर रस्त्यावरील बंद घराची कडी तोडून.

download

आत प्रवेश करत कपाटातील दिड लाख रुपये किंमतीचे पाच तोळे सोन्याची लगड, ३० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम सोन्याची चैन, ६० हजार रुपये किंमतीच्या चार ग्रॅम वजनाचे पाच अंगठ्या, ३३ हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम  सोन्याचे मंगळसूत्र, एक लाख १२ हजार रुपये किंमतीचे चार तोळे सोन्याच्या दोन बांगळ्या, २६ हजार रुपये किंमतीचे ७५० ग्राम चांदीचे दागिने, तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख बावीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना.

दि‌. ३१ रोजी सकाळी उघडकीस येताच परिसरातील त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घर मालकांशी संपर्क करून माहिती कळविल्याने वरील मुद्देमाल लोखंडी कपाटात सुरक्षित आहे का नाही..? असे श्री गारुंगे यांनी विचारले असता.

Daring house burglary
Daring house burglary

त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, घरातील  कपाटातील संपूर्ण सोने चांदीचे दागिन्यांची चोरी झाली आहे. घटनेची माहिती दोंडाईचा पोलिसांना कळविल्यावर पोलीस उपनिरीक्षक प्रदिप पवार घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाहणी करून परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची शोधाशोध सुरू केली होती. जबरी घरफोडी असल्याने धुळे येथील ठसे तज्ञ साहय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात, असई धनंजय मोरे, पोलीस नाईक मनोज ब्राम्हणे, पोलीस हवालदार सुरेश भालेराव दाखल होऊन ठसे घेण्यात आले. तसेच श्वास पथकाला देखील प्राचारण करण्यात आले होते. श्वानाने देखील दूरपर्यंत मार्ग दाखविला.

मात्र शहरात घरफोडी, दुकानफोडी मोबाईल चोरी, मोटारसायकल चोरीच्या आदी घटनेने नागरिक भयभीत झाले आहे. यातून पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दोंडाईचा पोलिसांना या घरफोडीतील चोरट्यांना पकडणे हे मोठे आव्हानच त्यांच्या समोर उभे ठाकले आहे.. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात चार लाख बावीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदिप सोनवणे करीत आहे…

✍ समाधान ठाकरे दोंडाईचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here