दोंडाईचा (Dondaicha): शहरातील स्टेशन भागातील बंद झालेली जुनी अंजुम टाकी जवळील भर रस्त्यावरील बंद घराची कडी तोडून घरातील सोने चांदीचे दागिन्यांसह तीन हजाराची रोकड असा एकूण चार लाख बावीस हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी दि. ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोंडाईचात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात सुभाष रामचंद्र गारुंगे (वय 66 वर्ष) रा. (जुनी अंजुम टाकी समोर चित्ते साहेबांच्या वखारी जवळ प्लॉट नंबर 109 दोंडाईचा ता. शिंदखेडा) येथे राहणारे भाऊ किशोर रामचंद्र गारूंगे त्यांच्या मालकीचे घर असून ते त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून परिवारासह गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे ते वैद्यकीय उपचारासाठी गेले होते. याच संधीचे सोने करत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून रात्रीच्या सुमारास भर रस्त्यावरील बंद घराची कडी तोडून.
आत प्रवेश करत कपाटातील दिड लाख रुपये किंमतीचे पाच तोळे सोन्याची लगड, ३० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम सोन्याची चैन, ६० हजार रुपये किंमतीच्या चार ग्रॅम वजनाचे पाच अंगठ्या, ३३ हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, एक लाख १२ हजार रुपये किंमतीचे चार तोळे सोन्याच्या दोन बांगळ्या, २६ हजार रुपये किंमतीचे ७५० ग्राम चांदीचे दागिने, तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख बावीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा- Niharika Koli Death Case: धुळ्यात आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे रस्ता रोको; CBI चौकशीची मागणी..!
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
- Asaduddin Owaisi On Elon Musk: ‘मोदींचा विरोध करू, पण गोऱ्यांचा हस्तक्षेप नाही!’; ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा
- Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश..!
- Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?
हे देखील वाचा:
दि. ३१ रोजी सकाळी उघडकीस येताच परिसरातील त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घर मालकांशी संपर्क करून माहिती कळविल्याने वरील मुद्देमाल लोखंडी कपाटात सुरक्षित आहे का नाही..? असे श्री गारुंगे यांनी विचारले असता.


त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, घरातील कपाटातील संपूर्ण सोने चांदीचे दागिन्यांची चोरी झाली आहे. घटनेची माहिती दोंडाईचा पोलिसांना कळविल्यावर पोलीस उपनिरीक्षक प्रदिप पवार घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाहणी करून परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची शोधाशोध सुरू केली होती. जबरी घरफोडी असल्याने धुळे येथील ठसे तज्ञ साहय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात, असई धनंजय मोरे, पोलीस नाईक मनोज ब्राम्हणे, पोलीस हवालदार सुरेश भालेराव दाखल होऊन ठसे घेण्यात आले. तसेच श्वास पथकाला देखील प्राचारण करण्यात आले होते. श्वानाने देखील दूरपर्यंत मार्ग दाखविला.
मात्र शहरात घरफोडी, दुकानफोडी मोबाईल चोरी, मोटारसायकल चोरीच्या आदी घटनेने नागरिक भयभीत झाले आहे. यातून पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दोंडाईचा पोलिसांना या घरफोडीतील चोरट्यांना पकडणे हे मोठे आव्हानच त्यांच्या समोर उभे ठाकले आहे.. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात चार लाख बावीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदिप सोनवणे करीत आहे…
✍ समाधान ठाकरे दोंडाईचा


