नंदुरबार जिल्ह्यातील साक्री (Sakri) पोलिसांनी म्हसदी गावात गावठी दारूचा साठा नष्ट केला. या कारवाईत 7 लाख रुपयांचा गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मोतीराम टी निकम यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, म्हसदी गावातून काळगाव रोडने जंगलात गेल्यावर एक इसम गावठी दारू पाडत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यात पोलिसांना तीन गावठी हातभट्ट्यांचा सापळा लागला. या हातभट्ट्यांवर दारू तयार केली जात होती. तसेच, पोलिसांना 7 लाख रुपयांचा गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
या कारवाईत साक्री पोलीस स्टेशनचे पोसई प्रसाद रौंदळ, पोहेकॉ 230 विक्रांत देसले, पोहेका 1257 दिपक विसपुते, पोना/1481 शांतीलाल पाटील, पोकों/396 तुषार जाधव आणि पोका/845 अर्जुन खलाणे यांनी सहभाग घेतला.
- Nandurbar Astamba Yatra:अस्तंबा यात्रेदरम्यान दुर्दैवी दुर्घटना; ४००० फूट दरीत कोसळून भाविकाचा मृत्यू, ५ दिवसानंतर मृतदेहाचा शोध
- Nandurbar News : अक्कलकुव्यात रात्रीच्या अंधारात दगडफेक; २५ दिवसांपासून नागरिक दहशतीत…!
- Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ७ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित; चौथ्या यादीत अवघ्या ४२३ जणांचा समावेश..!
- Thane News Dombivli Sangeet Bhajanotsav Competition: डोंबिवलीत २४ व २५ ऑक्टोबरला भव्य संगीत भजनोत्सव स्पर्धा!
- Nandurbar News MLA Chandrakant Raghuvanshi MSEDCL: दुष्काळात शेतकऱ्यांना ६ तास अखंड वीज द्या; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी..!
पोलिसांनी सांगितले की, या कारवाईत पळून गेलेल्या संजय रामदास माळीच याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले
साक्रीतील नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. नागरिकांनी सांगितले की, गावठी दारूमुळे समाजात अनेक समस्या निर्माण होतात. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध दारूच्या विक्रीवर अंकुश बसेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
✍जितेंद्र जगडाळे साक्री


