Dhule News – धुळे तालुक्यातील नेर ( Ner ) येथील यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ( Yashwant English Medium School ) 3 जानेवारी 2023 रोजी स्त्री शिक्षणाच्या आणि स्त्री स्वातंत्र्याच्या मुक्तिदाता सावित्रीबाई फुले जयंती ( Savitribai Phule Jayanti ) उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब पगारे सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ रंजीता अमृतसागर व श्री सुनील अमृतसागर, सौ शोभा सोनवणे व श्री विकास सोनवणे, सौ ललिता पाटील व श्री दिनकर पाटील, श्रीमती स्वाती महाले, सौ माधुरी सोनवणे आदि पालक उपस्थित होते.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना श्री पगारे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची सराहना केली. त्यांनी सांगितले की, महिलांना स्त्री शिक्षणाची दारे उघडी करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास, निर्भिडपणे प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणे उभे राहण्यास ज्यांनी खऱ्या अर्थाने स्त्रियांना खणखर बनवले त्या सावित्रीबाई फुले ह्याच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या मुक्तिदाता आहेत.
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
- सरकारी कार्यालयात ID Card नसेल, तर Government Employee च्या पगार कापणार? मोठा निर्णय
यावेळी शौर्य अमृतसागर हा विद्यार्थी महात्मा ज्योतिबा फुले तर, कार्तिकी पगारे, विधि अहिराव, ट्विंकल वाघ, अभीश्री शिंदे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केली होती. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःची मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश सोनवणे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र घोंगडे, उपप्राचार्य योगेश गातवे, व्यवस्थापिका सुलभा मोरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली आणि त्यांना प्रेरणा मिळाली.
✍🏻 कर्तव्यदक्ष पोलीस धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे


