साक्री ( Sakri ) तालुक्यातील ( Dhule News Today ) बंद पडलेल्या सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता गिरीश नेरकर यांनी केला आहे. त्यांनी या संस्थांची एस.आय.टी ( SIT ) चौकशीची मागणी केली आहे.
साक्री ( Sakri ) तालुक्यातील बंद पडलेल्या सहकारी संस्थाची एस.आय.टी ( SIT ) चौकशीची गिरीश नेरकरांची मागणी करण्यात आली आहे.तसेच नेत्यांच्या राजकारणाचा भक्कम पाया म्हणून सहकार क्षेत्राकडे पाहिले जाते. त्यामुळे देश आणि राज्यपातळीवरील राजकारण करताना स्थानिक सहकारी संस्थांवरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी नेत्यांची धडपड असते. अलीकडे हेच सहकारातील राजकारण नेत्यांना जड वाटू लागले का? त्यांची पकड ढिली होत आहे का? चांगल्या चाललेल्या संस्था बंद पाडून त्या खासगी कंपन्यांमार्फत विकत घेण्याचा सपाटा का सुरू आहे? सहकारी संस्था का मोडीत काढत आहेत?
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत नवे नेतृत्व विकसित करणारी चळवळ म्हणून सहकार चळवळीकडे पाहिले जाते. यशवंतराव चव्हाण,शरद पवार यांसारख्या नेत्यांनी प्रयत्न करून राज्यात सहकार चळवळ वाढविली व ती देशात पोहचली. ज्या काळात खासगी कंपन्यांचे जाळे नव्हते, शिवाय त्यांचा अनुभवही चांगला येत नव्हता, त्या काळात ग्रामीण भागातून सहकारातून साखर कारखाने,दूध संघ,मार्केट कमिटी,विकास सोसायटी आणि अन्य संस्था उभ्या राहिल्या.
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
- Nandurbar News : नंदुरबार शहरात पोलिसांची दारू प्रकरणी यशस्वी कारवाई…!
- Nandurbar News : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा..!
अर्थात यासाठी त्या त्या भागातील नेत्यांनी पुढाकार घेतला असला तरी या संस्थांची अंतिम मालकी शेतकऱ्यांचीच आहे. ग्रामीण भगातील शेतकऱ्यांना जगण्याची उभारी देणाऱ्या या संस्थावरच अर्थकारण आणि राजकारणही अवलंबून आहे. याच सहकारी चळवळीतून नेते घडत गेले. सध्या राज्यात आणि देशपातळीवरीही कार्यरत असलेले अनेक नेते याच सहकारी चळवळीतून पुढे आलेले आहेत. त्यांच्या राजकारणाचा भक्कम पाया या सहकारी संस्थाच आहेत.असे असूनही मधल्या काळात या सहकारी संस्थांमधील राजकारण विकोपाला गेले. त्यातून संस्था बंद पडत गेल्या.
त्याही पुढे जाऊन असा आरोप होत आहे की, काही संस्था मुद्दाम आजारी पाडल्या आणि त्यांचे लिलाव करून काही नेत्यांनीच गिळंकृत केल्या.राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकेकाळी पै पै जमवून कारखान्याचा शेअर घेऊन सभासद झालेल्यांना कारखाना विकताना काही मिळाले तर नाहीच, उलट आज याचक बनून खाजगी कंपनीच्या दारात जाण्याची वेळ आली आहे.
सध्या साक्री तालुक्यात असेच दूधसंघ मोडकळीस काढून जागा हडप करण्याचे कट कारस्थान रचले जात आहे.पण ते पूर्ण होऊ देणार नाही असा संकल्प साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्या अनुषंगाने साक्री तालुक्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी सर्व सहकारी संस्थावर आपली स्वतःची मालमत्ता समजून लक्ष देऊन कुठल्याही गटतटाला थारा न देता सदर संस्था भ्रष्टाचार मुक्त कराव्या व जेणेकरून सहकार क्षेत्र मोडकळीस येणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.असे आव्हान सामाजिक कार्यकर्ता तथा वसमारचे मा. सरपंच गिरीश विश्वासराव नेरकर यांच्याकडून करण्यात आले.
✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे