कृषी सेवा केंद्र बंद आंदोलन: विक्रेते सरकारच्या नवीन कायद्याला विरोध | Dhule News Vendors Oppose Govt’s New Act

0
304
Vendors Oppose Govt's New Act

Dhule : महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या कृषीनिविष्ठांवरील नवीन कायद्याला धुळे तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांनी विरोध दर्शवला आहे. या निषेधार्थ 2 ते 4 नोव्हेंबर 2023 दरम्यान धुळे तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

download

धुळे ग्रामीण सीड्स, पेस्टिसाइड, फर्टीलायझर, डीलर असोशियनच्या वतीने आज धुळे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शरद खलाणे, उपाध्यक्ष प्रवीण गिरासे, सचिव चंद्रकांत देवरे, सहसचिव गौरव सुनील वाघ, खजिनदार भानुदास माळी, सदस्य प्रवीण भदाणे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या कृषीनिविष्ठांच्या विक्रीवर अस्तित्वात असलेल्या कायद्यांद्वारे कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्याची पुरेशी तरतूद आहे. मात्र, सरकार पुन्हा नवीन कायदे बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या कायद्यांना कृषी सेवा केंद्रांचा विरोध आहे.

नवीन कायद्यांमुळे कृषी सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध येतील. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेले कृषीनिविष्ठे खरेदी करणे कठीण होईल. यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात सरकारला नवीन कायदे रदद करण्याची विनंती करण्यात आली आहे.

✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here