नंदुरबार : अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावरील देवमोगरा पुनर्वसन येथे भरधाव वेगातील वाहन उलटल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा:
याबाबत पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील इच्छागव्हाण येथील मितेश मगन पाडवी हा त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.जी.जे.२६ पी ४९४२) घेवून अक्कलकुवा ते मोलगी रस्त्याने जात होता. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालविल्याने देवमोगरा पुनर्वसन गावाजवळ वाहन उलटल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात मितेश पाडवी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच वाहनाचेही नुकसान झाले.
याबाबत पोहेकॉ.रामचंद्र मोहने यांच्या फिर्यादीवरुन मयत मितेश पाडवी याच्याविरोधात अक्कलकुवा भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा मल १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रामचंद्र मोहने करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.
