नवापुरात दोन लाखाची वीज चोरी

0
127

नंदुरबार : नवापूर शहरातील एम पार्क येथे सुमारे दोन लाख रुपये किंमतीची वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pic

नवापूर शहरातील अशपात सत्तारभाई बेलदार याने महावितरण कंपनीचे ७३ महिन्यांचे १६ हजार २४ युनिट वीज चोरीचे निर्धारण १ लाख ७८ हजार ३५४ रुपये व तडजोड आकार ४ हजार रुपये इतके असे एकूण १ लाख ८२ हजार ३५४ रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे आढळून आले.

याबाबत नंदुरबार महावितरण कंपनीच्या भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अशपाक सत्तारभाई बेलदार याच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा कलम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here