बिरसा मुंडा सभागृहात बैठक; जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली माहिती
नंदुरबार :- विविध विभागाच्या शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणार असून विविध योजनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.
शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृहात बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, मीनल करनवाल, मुख्याधिकारी पुलकीत सिंह, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शासकीय योजनांची जत्रा उपक्रमांत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ या उपक्रमांतर्गत देण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येणार असल्याने हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे, या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दोन दिवसात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जिल्हा जनकल्याण कक्षाची स्थापना करावी. प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती विहीत नमून्यात गुगल शिटवर भरुन द्यावी. तसेच प्रत्येक विभागाने दररोज केलेल्या कामाचा अहवाल गुगल शिटवर उपलब्ध करुन द्यावा.
यासंदर्भात प्रत्येक विभागाने आपल्यास्तरावर बैठका घ्याव्यात. जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे इत्यादी कार्यवाही ही १५ मे पूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
जत्रा शासकीय योजनांची उपक्रम जिल्हा व तालुकास्तरावर १५ जूनपूर्वी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाच्या असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.
दृष्टिक्षेपात जत्रा शासकीय योजनांची
✅ अभियानांत किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ प्रदान करणार
✅ अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेणार.
✅ उपक्रमांची पूर्वतयारी १५ एप्रिल ते १५ मे २०२३ या कालावधीत
✅ जिल्हात १५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीत उपक्रम राबवणार
✅ अभियानात शासनाचे विविध विभाग सहभागी होणार
✅ सर्व विभाग एकाच छताखाली एकत्र येऊन लाभार्थ्यांना लाभ
एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो नंदुरबार.