विद्यार्थ्यांच्या आईस्क्रीम कोन पार्टीत माजी आ.चंद्रकांत रघुवंशींचा सल्ला…

0
163

नंदुरबार -७/४/२३

मुलांनो,उन्हाचे दिवस असल्याने बाहेर जास्त खेळू नये.उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या सदुपयोग करावा.

आई-वडिलांच्या सूचनांचे पालन करून अभ्यास करा आणि मोठ्ठे बना असा सल्ला माजी आमदार तथा शिवसेनेचे धुळे- नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी बच्चे कंपनीला दिला आहे. निमित्त होते चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या आईस्क्रीम कोन पार्टीचे.

आज पासून अनेक खाजगी प्राथमिक शाळांना सुट्ट्या लागत आहेत

त्यानिमित्त मागील वर्षा प्रमाणे यंदाही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आईस्क्रीमची पार्टी दिली.

शहरातील अनेक खाजगी शाळांमधील साधारणता ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आईस्क्रीम कोनचे वाटप करण्यात आले.

शाळेच्या बसेस विद्यार्थ्यांना घरी पोचवण्यासाठी जातांना आमदार कार्यालयाजवळ थांबऊन त्यांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत आईस्क्रीम कोन दिला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

… अन् रंगले गप्पांचे फड

शाळांच्या बस मध्ये स्वतःआत जाऊन विद्यार्थ्यांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आईस्क्रीम कोन दिला.

यावेळी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी मनसोक्त गप्पा केल्या. विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रतिसाद देत गप्पांचे फड रंगवले.

दिला मोलाचा सल्ला

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हा तन्हात बाहेर खेळायला जाऊ नये.

घरात राहूनच बैठे खेळ खेळावेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या सदुपयोग अभ्यास करून करावा.

मोबाईलचे जास्त वापर करू नये त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.

भरपूर अभ्यास करून मोठ्ठं व्हावं असा मोलाचे सल्ला माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी उपस्थित होते

प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here