सुंदरदे येथे उपनगर पोलीसांची कारवाई; दोन संशयितांविरोधात गुन्हाफोटोनंदुरबार: तालुक्यातील सुंदरदे येथे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह सुमारे ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी केली.उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पानाजी वसावे, पोशि. विलास देवदान वसावे, पोशि. विपुल भिमराव पाटील, चापोशि.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
बाबुराव बागुल व होमगार्ड हेमंत राजेंद्र राजपुत असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील सुंदरदे येथील बसस्थानकावर चारचाकी वाहनातून(क्र. एमएच ३९एडी १८७७) गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समजले. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाड टाकली असता एक वाहन उभे असल्याचे दिसून आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
रात्री अडीच वाजेच्या सुमारास वाहनाची तपासणी केली असता त्यात एकुण २४ लाख ०३ हजार १२० रुपये किंमतीचा गुटखा मिळुन आल. तसेच वाहतूकीसाठी वापरलेले आठ लाखांचे वाहन असा सुमारे ३२ लाख ०३ हजार १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. चालकाने त्याचे नाव सचिन भगवान पाटील व शेजारी बसलेला इसमाने रत्नदिप वासुदेव पाटील ऊर्फ राकेश किशोर राजपुत असे सांगितले. दोघांविरुध्द सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पानाजी फत्तु वसावे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८, २७२, २७३ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (२), २७ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पानाजी वसावे, केशव गावित, पोशि. विलास वसावे, विपुल भिमराव पाटील, बाबुराव बागुल व होमगार्ड हेमंत राजेंद्र राजपुत यांच्या पथकाने केली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्यूरो नंदुरबार