तळोदा : १७/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 शिवचरित्र वक्ते किरण चव्हाण यांनी टाकला प्रकाशझोत
2 आमलाड शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला व्याख्यानाचा लाभ
नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. तळोद्यात देखील हा उत्साह पहावयास मिळाला.
विद्या सहयोग संस्था संचालित माध्यमिक विद्यालय आमलाड तर प्राथमिक विद्यालय आमलाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त व्याख्यान आयोजन करण्यात आलं होतं. प्रमुख वक्ते म्हणून शिवचरित्र वक्ते किरण चव्हाण लाभले होते.
अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन व्ही मराठे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सारिका चौधरी आणि सुनीता चव्हाण होत्या.
यावेळी किरण चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य सहासी, कुशल सूक्ष्मबद्ध नियोजन , युद्धनीती, यासह विविध पैलूंवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांसमोर त्यांचा इतिहास उभा केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय एस मासुळे यांनी केलं होतं. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
महेंद्र सूर्यवंशी तळोदा तालुका प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज तळोदा