ग्रामपंचायत धुळवदचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मान ..

नंदुरबार : ११/३/२०२३

नाशिक विभागीय आयुक्तालयात निवड झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण करण्यात आलं ..

ADVERTISEMENT

विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत धुळवद ता. नंदुरबार जि.नंदुरबार यांना देण्यात आला.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले.

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉ.राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच सौ. कल्पना गोविंद वळवी , ग्रामसेवक श्री.मधुकर भोये व पंचायत समितीचे मा.सदस्य गुड्डू भैय्या परदेशी यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले..

धुळवद ग्रामपंचायत शिवसेना संपर्क प्रमुख मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध प्रकारच्या योजना राबवित असुन नाशिक विभागात राज्य पुरस्क्रुत योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला.

यावेळी जि.प.नंदुरबार चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व अधिकारी उपस्थित होते ..

पुरस्कार्थी गावाचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, विभागीय आयुक्त कार्यालय नासिक येथे उपस्थित होते…

पुरस्कार मिळाला बद्दल शिवसेना नेते संपर्क प्रमुख मा.आ.चंद्रकांत रघुवंशी., शिवसेना जिल्हा अध्यक्ष अँड. रामभैय्या रघुवंशी यांनी अभिनंदन केले आहे….

नारायण ढोडरे,
प्रतिनिधी :- ग्रामीण नंदुरबार, एम डी टी व्ही न्यूज..

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here