जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी उपलब्ध केला निधी
नंदुरबार :- एखाद्या कामात खोड पडला की ते कसे रखडते याचा अनुभव आपण अनेकवेळा घेत असतो. याचाच अनुभव नंदुरबारच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनींनी देखील अनुभवला आहे. येथील शासकीय तंत्रनिकेतन अंतर्गत मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वस्तीगृह इमारतीच्या मुहूर्तासाठी तब्बल १४ वर्षांची प्रतिक्षा करावी लागली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधकाम करण्यात आलेले असतांना केवळ संरक्षक भिंत व पाण्याची सोय नसल्याने ही इमारत धूळखात पडून होती. मात्र, प्राचार्यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी निधी उपलब्ध करुन दिला आता ही समस्या सुटणार आहेत. येत्या जूनमध्ये सदर इमारत विद्यार्थीनींसाठी खुली होण्याची शक्यता व्यक्त होत असून यामुळे तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी निवासाची सोय होणार आहे.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी वस्तीगृह उभारण्यात आले होते.अनेक वर्षांपासून ते पडून होते. विद्यार्थीनींच्या सोयीसाठी ते सुरू करणे गरजेचे होते. यामुळे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याचे काम सुरू असून ते लवकरच कार्यान्वित होईल,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी व्यक्त केली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगाराच्यादृष्टीने तंत्रनिकेतनचे शिक्षण घेता यावे, यासाठी नंदुरबारमध्ये सन २००९ मध्ये शासकीय तंत्रनिकेतनची सुरुवात करण्यात आली. या संस्थेत यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी व अणूविद्युत अभियांत्रिकी अशा एकूण चार शाखा सुरु करण्यात आल्या. सदर शासकीय तंत्रनिकेतनच्या उभारणीसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. तंत्रनिकेतनमध्ये अधिकारी व कर्मचारी असे एकूण ६१ कर्मचारी कार्यरत आहेत. सदरची वास्तू सुमारे २० एकर जागेत उभारण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची निवासाची सोय व्हावी यासाठी सुमारे १ कोटींपेक्षा अधिकची रक्कम खर्चुन प्रशस्त अशी इमारत उभारण्यात आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मात्र गेल्या १४ वर्षांपासून इमारत उभारल्यानंतर पाणी व सरंक्षक भिंतीची समस्या न सुटल्याने सदरची वास्तू धूळखात पडली आहे. तंत्रनिकेतनमधील प्राचार्यांनी निधी उपलब्ध होण्यासाठी सततचा पाठपुरावा केल्याने आता निधी उपलब्ध झाला असुन वस्तीगृह दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे ३० लाख रुपयांचा निधी संरक्षक भिंतीच्या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुमारे ५५ लाख रुपये खर्चून पाईपलाईन आणण्यात आली असून आता वस्तीगृहाची पाण्याची समस्यादेखील सुटणार आहे. त्याचप्रमाणे तंत्रनिकेतनची इमारत व वस्तीगृहासाठी एक कोटी ६ लाख रुपये खर्चून सोलरची व्यवस्था करण्यात आल्याने वीजेचा व वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. याशिवाय इमारत परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून सुरक्षेचा प्रश्नही सुटणार आहे.
जीवन पाटील, कार्यकारी संपादक. एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार