जीवन तुझे आम्हास प्रेरणा,दाही दिशा तुझीच गर्जना,भीमराया… माझा भीमराया…

नंदनगरीत मेहत्तर वस्तीत बाबासाहेबांना अभिवादन

नंदुरबार -१६/४/२३

ADVERTISEMENT

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त शहरातील मेहतर वस्तीत प्रतिमा पूजन आणि संविधान वाचन उपक्रम घेण्यात आला.
नंदुरबार नगर परिषदेच्या माजी नगराधयक्षा शिला रमेश कडोसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक रमेश कडोसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
संयोजक सामाजिक कार्यकर्ते कमल कडोसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगितली.
अभिवादन कार्यक्रमास नंदुरबार मुन्सिपल कर्मचारी सोसायटीचे चेअरमन हेमंत जाधव, इंदर चिरावंडे, दीपक कडोसे, सुजित कडोसे, गुड्डू कडोसे, बलवंत भुरट, सचिन भिडे, सुरज भिडे, सागर कडोसे, कल्पना वळवी, सीता वळवी, शांती वळवी आदींसह मेहतर वस्ती परिसरातील महिला, पुरुष, युवक,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिवादन कार्यक्रमाचे संयोजन कमल कडोसे यांनी केले.

प्रविण चव्हाण, एम. डी टी.व्ही न्यूज ,जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here