नंदुरबार जिल्ह्यातील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
289

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील दोन तहसीलदार तर दोन उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी राज्यातील तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे परिपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये २० तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील दोन तहसीलदार संगर्वातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शहादा तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांची नाशिक प्रबोधिनी येथे मनिषा घाटगे यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर मिलींद कुलकर्णी यांच्या रिक्त जागेवर त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदार दीपक गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांची पारोळा येथील तहसीलदार अनिल गवांदे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर पदस्थापना करण्यात आली आहे. तर डॉ.देवरे यांच्या जागेवर पारोळा येथील तहसीलदार अनिल गवांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी संवर्गातील राज्यातील १८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांची धुळे येथील पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नंदुरबार येथील रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांची अहमदनगर येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here