शहाद्यात भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
388

शहादा – खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाट्यावर अपघात
मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बस चालकावर गुन्हा दाखल

नंदुरबार : शहादा-खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाट्याजवळ भरधाव वेगातील मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या एस.टी.बसने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
66502925

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील सेंधवा येथील राकेश तुकाराम बडोले (वय २५) व त्यांचा मित्र विजय विक्रम चव्हाण (वय २४) हे दुचाकीने (क्र.एम.पी.४६ एम.टी. ७१६४) शहादा-खेतिया रस्त्याने जात होते. यावेळी मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या एस.टी. बस चालकाने त्याच्या ताब्यातील एस.टी.बस (क्र.एम.एच.४६ पी २१५६) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून सुलतानपूर फाट्याजवळ मागून दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात राकेश बडोले यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मित्रही जखमी झाला आहे.

SPONSORED CONTENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर एस.टी.बसचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत तुकाराम मन्या बडोले यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १३४, १८६, १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जितेंद्र पाडवी करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here