श्रीरामपूर :२०/२/२३
शॉर्ट
१. गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी केली वेशभूषा परिधान
२. लेझीम पथकाच्या सादरीकरणानं मिळवली गावकऱ्यांची दाद
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे आज विविध कलागुणांसह शिवजयंती साजरी करण्यात आली.
सकाळी गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकासह गावात रॅली काढली.
यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मातांची वेशभुषा लक्ष वेधुन घेत होती .
तर शिवरायांच्या घोषणांनी व ढोल पथकासह लेझीमने आसमंत दुमदुमून गेला होता.पाहू या लेझीम सादरीकरण ..[ क्लिप १ मिनी १७ सेकंड लावा ]
यानंतर छत्रपती चौक येथे रॅलीची सांगता होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन व आरती करण्यात आली. यानंतर व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला.याबरोबरच विद्यालय,खोकर सोसायटी,ग्रामपंचायत कार्यालय याठीकाणी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आल.
यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, ग्रामस्थ व शिवप्रेमी,तरुण उपस्थित होते.
तात्यासाहेब शेरकर,श्रीरामपूर प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज