नंदुरबार -१३/४/२३
नंदुरबार जिल्ह्यात गांजा, अफु इत्यादी प्रकारच्या अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड, विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
शहादा पोलीस ठाणे हद्दीतील शहाणा गावी राहणारा गणेश शिवाजी भंडारी हा त्याचे कपाशी पिकाचे शेतात स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड करुन त्याची जोपासना करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांचे अधिकारी व अमंलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमी प्रमाणे शहाणाबर्डी गावाचे उजव्या हातास असलेल्या कच्च्या रस्त्याने पायपीट करुन नाला ओलांडून शेता जवळ आले.
शेतात एका कुडामातीचे घरा जवळ कपाशी पिकाचे शेतात एक इसम हालचाली करत असल्याचे दिसुन आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
ताब्यात घेण्यात आलेला इसम गणेश शिवाजी भंडारी, (43) रा. शहाणा, ता.शहादा, जि.नंदुरबार. असे संशयिताचे नाव आहे
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे संपूर्ण शेतातून 333 किलो 838 ग्रॅम वजनाचे 23 लाख 36 हजार 796 रुपये किंमतीची एकुण 3600 गांजाची झाडे मिळुन आल्याने गांजाची झाडे आढळून आली ..
तसेच गणेश शिवाजी भंडारी, (43), रा. शहाणा, ता.शहादा, जि.नंदुरबार याचेविरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 172/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 8(क),20(ब),ii,(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली ..
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहादा पोलीस ठाणे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, स्थानिक गुन्हे शाखा सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, दिपक गोरे, राकेश वसावे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, मनोज नाईक, सुनिल पाडवी, विशाल नागरे, बापू बागूल, संजय रामोळे, तुषार पाटील, विजय ढिवरे, रामेश्वर चव्हाण, चेतन चौधरी, आनंदा मराठे, दिपक भोई यांच्या पथकाने केली.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, तंबाखूजन्य व अमंली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात.
तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो.
तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहून नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करावे.
प्रविण चव्हाण ,एम डी टी व्ही न्यूज ,जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.