मुबारकपुरकरांना मिळाला ‘आनंदाचा शिधा’…

नंदुरबार -८/४/२३

तालुक्यातील मुबारकपुर येथे शुक्रवारी सरपंच ताईबाई अहेर यांच्या हस्ते शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.

ADVERTISEMENT

यात एक किलो रवा, एक किलो डाळ, एक किलो साखर व एक लीटर पामतेल देण्यात आले.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

राज्य सरकारने राज्यभरातील शिधापत्रिका धारकांचा गुढीपाडवा गोड करण्यासाठी त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. मात्र, ऐनवेळी शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी संप पुकारल्याने आनंदाचा शिधा मिळण्यास विलंब झाला.

अखेर उशिरा का असेना शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळाल्याने त्यांच्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे.

यावेळी सरपंच ताईबाई अहेर, पोलीस पाटील रविंद्र पवार, भारत अहेर, सुदाम अहेर, अनिल पवार, जतन पवार, वसंत पवार, दिवान पराडके, कपिल पवार, रविंद्र पवार, रेशन दुकानदार सुरेश पवार, रविंद्र पवार आदी उपस्थित होते.

निलेश अहेर, एम. डी. टी.व्ही न्यूज,नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here