नंदुरबार जिल्हा कारागृह – खुनाच्या गुन्ह्यातील कैदी फरार..रखवालदार भाऊ तुमचं लक्ष आहे कुठे ?

0
1205

नंदुरबार – १९/४/२३

नंदुरबार येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्हात अटकेत असलेल्या न्यायधीन बंदी छोटयाशा बोळीने पळुन संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन कायदेशीर रखवालीतुन पळुन गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान जिल्हा कारागृह नंदुरबार येथील सर्कल क्र १ ते ८ मधील कारागृहाच्या आतील साचलेला कचरा बाहेर टाकण्यासाठी ६ बंदिना होमगार्ड रविंद्र चव्हाण यांच्यासोबत पाठविण्यात आले होते

त्यावेळी तळोदा पोलीस ठाण्यातील भादंवि क ३०२ या गुन्हयात न्यायधीन बंदी क्र ५४ / २३ उदेसिंग कुशा वसावे रा- तळोदा हा जिल्हा कारागृह नंदुरबार येथील महिला विभागाच्या मागील बाजुने पळाला व तटाच्या बाजुने मेनगेट जवळील मुलाखत कक्षाच्या बाजुला असलेल्या छोटयाशा बोळीने पळुन संरक्षक भिंती वरुन उडी मारुन कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला.
या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याप्रकरणी तुरुंग अधिकारी संदिप एकनाथ चव्हाण यांच्या फिर्यादी वरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात उदेसिंग कुशा वसावे रा- तळोदा याच्या विरुध्द भादवी कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोह. सुरेश वसावे करीत आहेत.

प्रवीण चव्हाण ,प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार जिल्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here