Nandurbar News : तहसील कार्यालयात धडक कारवाई: गुटखा खाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई..!

0
147

Nandurbar News – शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत गुटखा खाऊन येणाऱ्या नागरिकांविरुद्ध आरोग्य विभागातर्फे धडक मोहीम राबविण्यात आली.सविस्तर असे की जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आद्देशान्वये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली.

सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात आरोग्य विभागाचे पथकातील अध्यक्ष तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे,तालुका आरोग्य विभाग सचिव डॉ रमाकांत बागुल, आरोग्य विस्तार अधिकारी विलास भामरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांच्या सहाय्याने तहसील कार्यालयाच्या परिसरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गुटखा खाल्ल्या असल्याची खात्री करून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशा गुटखेबाजांना प्रशासनातर्फे प्रत्येकी शंभर रुपये दंड आकारण्यात आला.सदर धडक मोहिमेत २ पानठेला चालावणारे,२ कर्मचारी व ३ सामान्य नागरिकांवर कारवाई करण्यात आली.सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कायदा २००३ (कोटपा) अनुसार करण्यात आली असल्याचे डॉ रमाकांत बागुल यांनी सांगितले. प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे, आरोग्य पथकातील एम एच एस एस चे प्राचार्य तुषार पाटील,आरोग्य विस्तार अधिकारी विलास भामरे, उपस्थित होते. वरील कारवाई डोंगरगावचे रविंद्र पाटील,भूपेंद्र राजपूत यांच्या समक्ष करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here