Nandurbar News : नंदुरबारमध्ये १६ लाखांचा अवैध गुटखासाठा जप्त | Illegal Gutkha stock seized

0
263
Nandurbar new News

Nandurbar News: नंदुरबार शहरातील सहारा टाउनजवळील शुभम पार्क येथील एका घरात १६ लाखांचा अवैध गुटखासाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भगवान पाटील (वय ३५, रा. प्लॉट नं. १८ बी., शुभम पार्क, सहारा टाउनजवळ, नंदुरबार) याच्या घरालगत कंपाउंडच्या गेटमध्ये प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा बेकायदा साठा केला होता. याबाबत गुप्त बातमी अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांना मिळाली.

तांबे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन तसेच शहर पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांना आदेशित केले. तसेच, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनाही माहिती दिली.

Nandurbar News Illegal Gutkha stock seized

पोलिसांनी छापा टाकला असता पानमसाला आणि तंबाखूचा बेकायदा साठा मिळाला. संशयित आरोपी सचिन पाटील पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पाटीलला साठ्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी हा साठा जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here