Nandurbar News: नंदुरबार शहरातील सहारा टाउनजवळील शुभम पार्क येथील एका घरात १६ लाखांचा अवैध गुटखासाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भगवान पाटील (वय ३५, रा. प्लॉट नं. १८ बी., शुभम पार्क, सहारा टाउनजवळ, नंदुरबार) याच्या घरालगत कंपाउंडच्या गेटमध्ये प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा बेकायदा साठा केला होता. याबाबत गुप्त बातमी अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांना मिळाली.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
- Asaduddin Owaisi On Elon Musk: ‘मोदींचा विरोध करू, पण गोऱ्यांचा हस्तक्षेप नाही!’; ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा
- Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश..!
- Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?
- Sonam Wangchuk Fast Ended: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांचे उपोषण मागे; सरकारने मागण्या केल्या मान्य..!
हे देखील वाचा:
तांबे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन तसेच शहर पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांना आदेशित केले. तसेच, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनाही माहिती दिली.

पोलिसांनी छापा टाकला असता पानमसाला आणि तंबाखूचा बेकायदा साठा मिळाला. संशयित आरोपी सचिन पाटील पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पाटीलला साठ्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी हा साठा जप्त केला.

