Nandurbar news – नंदुरबार आणि तळोदा शहरांना मोठा निधी मिळाला आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून नगर विकास विभागाकडून ५ कोटींच्या विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नंदुरबार शहरासाठी ४ कोटी तर तळोदासाठी १ कोटींची विकास कामे करण्यात येणार आहेत.
या निधीतून नंदुरबार शहरात शिव उद्यान धाम, ३४ शिवालयांचे बांधकाम, रस्ते, सांडपाणी, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्वच्छता यासारख्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निधी वापरला जाणार आहे.(Nandurbar news Large funds to Nandurbar and Taloda)
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिव उद्यान धाम या प्रकल्पासाठी यापूर्वीच १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आता पुन्हा ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शिव उद्यान धामच्या बांधकामाचा दुसरा टप्पा पूर्ण होईल.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणावर पं.प्रदीप मिश्रा यांचे अनुयायी आहेत. त्यांच्या मागणीनुसार शहरात विविध ३४ वसाहतींमध्ये शिव मंदिर बांधण्यात येणार आहे. यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीमुळे नंदुरबार आणि तळोदा शहरांची विकास कामे वेगाने होण्यास मदत होईल.
-
Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
-
Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
-
Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
-
LIVE TV